Monday, May 23, 2022

दहावी, बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी… असे केले तर व्हाल नापास

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीअत्यंत महत्त्वाची बातमी आहे. परीक्षार्थीं संदर्भात शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीची नेहमीच चर्चा होत असते. त्यासंदर्भात

वेगवेगळी पावले उचलली जात असतात. आता शिक्षण मंडळाने कॉपी करणाऱ्यांना चांगलाच दणका देणारा निर्णय घेतला आहे. आता बारावीची परीक्षा सुरू असून या परीक्षेत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढले आहेत. या विद्यार्थ्यांना थेट नापासच

करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. त्यामुळे कॉपी करण्यांचे धाबे दणाणणार आहे. कॉपी करणाऱ्या तीन जणांना अटकदेखील करण्यात आली आहे.बारावीच्या परीक्षेत एकाच दिवसात 41 जण कॉपी करताना सापडल्याने महाराष्ट्र

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बाबींची दखल घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात नऊ विभागीय मंडळं आहेत. शिक्षण मंडळाकडून या सर्व विभागात

परीक्षा योग्य रीतीने पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यात येते आहे. अर्थात कॉपी करण्याचे प्रकार आढळून येत असल्यामुळे शिक्षण मंडळाने कॉपी करणाऱ्यांना नापास करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध विभागात विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. यात केमिस्ट्रीच्या पेपरच्या वेळेस 27 विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. तर राज्यशास्त्राच्या पेपरच्या वेळेस 14 जण कॉपी करताना सापडले. यात मुंबईत 1, अमरावती येथे 8, लातूरमध्ये 2, नाशिकमध्ये 1,

औरंगाबादमध्ये 15 विद्यार्थी केमिस्ट्रीच्या पेपरच्या वेळेस कॉपी करताना सापडले आहेत. तर राज्यशास्त्राच्या पेपरच्या वेळेस अमरावती येथे 12, औरंगाबाद येथे 1 आणि लातूर येथे 1 जण कॉपी करताना सापडला आहे.

दरम्यान रसायनशास्त्राच्या पेपर फुटी प्रकरणानंतर विलेपार्ले पोलिसांनी संबंधित प्रोफेसर यादव याला अटक केली आहे. व्हॉट्सअॅप चॅटवरून हे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर करून केमिस्ट्रीचा

पेपर व्हायरल करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचीही पोलिसांनी चौकशी केली असून शिक्षण मंडळ यासंदर्भात खबरदारी घेते आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!