माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज दिनांक 16 मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यवविधी आज सायं 4:30 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.
सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव
तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते.माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या
माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला.
दरम्यान मागील वर्षी राज्यासह देशात करोनाच्या संसर्गाने तरुणाईचा बळी जातोय. अनेकांचे आयुष्य करोनाने उध्वस्त केले असले तरी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या ९३ वर्षी करोनावर विजय
मिळवून खंभीरपणे आपले दैनंदिन कामे करत असल्याचे पाहुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अचंबित झाले होते.