Wednesday, May 25, 2022

मोठी बातमी:होळी व धुलिवंदनाच्या उत्साहासाठी ; महाराष्ट्र सरकारची नियमावली जारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते.

यंदा देखील उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना राज्या सरकारकडून देण्यात आल्या आहे.होळी धुळवड निमित्ताने गृह खात्याची नियमावलीस र्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करणे बंधनकारक असेल.

रात्री 10 च्या आत होळी करण्यात यावी. होळी सणाच्या वेळी मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच

जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.होळी साजरा करताना मद्यपान करून विभत्स व उद्धट वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींच कोणीही छेड काढणार नाही.

याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असणार आहे.सध्या 10 वी बारावीच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. होळी सणानिमित्त आयोजिक कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर वाजवून परीक्षार्थींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देण्यात येऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक बॅनर लावण्यात येऊ नये.

होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये.

होळी सणानिमित्त कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये. उद्या आणि परवा होणाऱ्या होळी आणि धुलिवंदनाचा उत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या गृह विभागाकडून या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!