माय महाराष्ट्र न्यूज:भारतामध्ये किशोरवयीन मुलांनंतर आता कोविड 19 लसीकरणासाठी वयोमर्यादा 12 वर्षांपर्यंत खाली करण्यात आली आहे. नुकतीच केंद्र सरकारने 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड
19 ची प्रतिबंधात्मक लस दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. हैदराबादच्या Biological E’ची Corbevax ही लस 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी असणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत याची माहिती देताना ‘
जर मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित’ अशा आशयाचं ट्वीट लसीकरण मोहिमेत आता 12 वर्षांवरील सार्यांचा समावेश होत असल्याचं म्हटलं आहे.केंद्र सरकारच्या माहितीनुसार ज्यांचा जन्म 2008, 2009, 2010 मध्ये झाला आहे त्यांना लसीकरण
मोहिमेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. या वयोगटातील देशात 7.11 कोटी मुलं आहेत. www.cowin.gov.in या लिंकवरून कोविन अॅप ओपन करा.तुमच्या मुलाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी “Register/Sign In” टॅब वर क्लिक करा.
मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा त्यावर तुम्हांला ओटीपी मिळेल.पालकांनी पूर्वी त्यांनी घेतलेल्या लसीच्या डोस वेळेस रजिस्ट्रेशन केलेला नंबर वापरल्यास तुम्हांला उजव्या बाजुला Add Member वर क्लिक करावे लागेल.
नवीन नंबर असेल तर थेट Add Member वर क्लिक करा.मुलांच्या रजिस्ट्रेशन वेळेस काही कागदपत्र अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, स्कूल आयडी याचा समावेश केला जाऊ शकतो.
व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल.व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे स्लॉट बुकिंग करू शकाल.Corbevax ही लस देखील लहान मुलांना दोन डोस मध्ये दिली जाणार आहे.
28 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. Biological E Ltd कडून 5 कोटी डोस पुरवण्यात आले आहेत. केंद्राने त्याचे वाटप राज्यांना केले आहे.