नेवासा
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ता.नेवासा येथील वारकरी संप्रदायातील स्व.गोरक्षनाथ शंकरराव लोहकरे यांच्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात श्रीमद भागवत व एकादशी महात्म्य कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय लोहकरे यांनी दिली.
लोहकरेवस्ती येथे गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.सप्ताहात पहाटे काकडा भजन, विष्णु सहस्रनाम, सकाळी आठ ते साडे अकरा ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी दोन ते चार वाजता शरयू महाराज गायके यांची एकादशी महात्म्य कथा,सहा वाजता हरिपाठ तर रात्री आठ ते दहा वेळेत सोमनाथ महाराज पाटील यांच्या सुवाश्र वाणीतून भागवत कथा होणार आहे.
सप्ताहाचे व्यासपीठ चालक म्हणून निवृत्ती महाराज लांडे, बाळासाहेब महाराज बेल्हेकर,
संजय महाराज लोहकरे,अशोक महाराज नरवडे असून बुधवार दि.३१ मे २०२३ रोजी पुण्यस्मरण निमित्त सकाळी दहा वाजता उमेश महाराज दशरथे यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार दि.१ जून२०२३ रोजी सोमनाथ महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होणार आहे. परीसरातील ग्रामस्थ व भाविकांनी अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिश्चंद्र लोहकरे व डाॅ.अक्षय लोहकरे यांनी केले आहे.
————————————-