माय महाराष्ट्र न्यूज:टँकर खाली चिरडून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर जयराम काकडे (रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) असे मयत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मयत शंकर काकडे यांचा मुलगा रामदास शंकर काकडे (वय ४६) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
तर आरोपीमध्ये टँकर चालक शहादेव गहिनीनाथ दराडे (हल्ली रा. काकडे मळा, केडगाव) याचा समावेश आहे.मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान मयत शंकर काकडे हे रस्त्याने पायी जात होते.
यावेळी आरोपी शहादेव दराडे हा त्याच्या ताब्यातील टँकर (क्रमांक एमएच ०४ डीडी 4776) पाठी मागे घेत असताना शंकर काकडे यांना पाठीमागून धडक दिली. शंकर काकडे हे टँकरच्या पाठीमागील चाकाखाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर टॅंकरचालक आरोपी शहादेव दराडे टँकर तेथेच सोडून फरार झाला. कोतवाली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.