Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग:खळबळजनक:विवाहितेच्या चितेची अग्नी शांत होण्यापूर्वी त्याच स्मशानात तिच्या मित्राचाही खून

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात संशय घेवून सतत दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करण्याच्या प्रकाराला वैतागून डोळासणे येथील 31 वर्षीय विवाहितेने सोमवारी पहाटे आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्या विवाहितेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरुन डोळासणेसह जुन्नर तालुक्यातील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला, त्यात मयतेच्या मित्राचाही समावेश होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सदर

विवाहितेच्या चितेची अग्नी शांत होण्यापूर्वी त्याच स्मशानात तिच्या मित्राचाही अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. अवघ्या चोवीस तासांच्या कालावधीत घडलेल्या या दोन घटनांनी डोळासणेसह तालुक्याचा

संपूर्ण पठारभाग हादरला आहे. सागर रघुनाथ क्षीरसागर असे खून झालेल्या मित्राचेे नाव असून घारगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धक्कादायक घटनेबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

डोळासणे येथील स्वाती शिवराम क्षीरसागर (वय 31) या विवाहितेने सोमवारी (14 मार्च) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.या घटनेनंतर मयतेने लिहून ठेवलेली चिठ्ठी तिचे पती शिवराम सीताराम

क्षीरसागर यांच्या हाती लागल्याने त्यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मयतेची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करीत वरील दहा जणांविरुद्ध आत्महत्येस

प्रवृत्त केल्यासह भारतीय दंडविधानच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात करीत याप्रकरणी मयतेच्या मित्राची आई शैला उर्फ हौसा रघुनाथ भालेराव व बहीण रंजना रोहिदास उत्तर्डे या दोघींना अटक केली. त्यानंतर डोळासणे येथील स्मशानात

मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेनंतर मंगळवारी सकाळी विवाहितेचा सावडण्याचा विधी होता. त्यासाठी तिच्या नातेवाईकांसह गावातील मंडळी स्मशानात गेली असता सदर विवाहितेवर अंत्यसंस्कार झालेल्या

ओट्याजवळच सागर रघुनाथ भालेराव याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून तेथे गेलेल्या नागरिकांची भंबेरीच उडाली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी फौजफाट्यासह तेथे धाव

घेतली, काही वेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदनेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्मशानात खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या सागर भालेराव याचे व आत्महत्या केलेल्या स्वाती क्षीरसागर यांच्यात मैत्रीचे संबंध होते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!