नेवासा
नेवासा येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या डॉ. हेडगेवार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जेष्ठ मार्गदर्शक संचालक सुरेशराव नळकांडे यांची तर व्हॉईस चेअरमनपदी सौ.मिनाताई परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नेवासा शहरातील डॉ हेडगेवार पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडनुक बिनविरोध पद्धतीने पार पडली.बुधवार दि. २४ मे रोजी चेअरमन व व्हाईस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस.ए. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरेश नळकांडे याच्या अध्यक्ष पदाच्या नावाची सूचना संचालक पत्रकार शाम मापारी यांनी मांडली त्यास संचालक सुभाष कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले
उपाध्यक्ष पदासाठी सौ.मीनाताई परदेशी यांच्या नावाची सूचना संचालक कैलास करंडे यांनी मांडली त्यास संचालक विनोद नळकांडे यांनी अनुमोदन दिले.या दोन्हीही निवडी बिनविरोध झाल्या त्याबद्दल टाळ्यांचा गजर करत नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेशराव नळकांडे व उपाध्यक्ष सौ.मीनाताई परदेशी यांचे अभिनंदन उपस्थित संचालक मंडळाने केले.
या बैठकीस यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेच्या प्रसंगी जेष्ठ संचालक अरविंद मापारीं,गणेश परदेशी, श्रीमती नंदा नळकांडे,हे उपस्थित होते यावेळी अशोक केने, गोपाळ बडवे,मनोज देव, राम सचदे,गणेश नाबदे उपस्थित होते.पतसंस्थेच्या कॅशियर सौ. कावेरी नाबदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.