माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी पहिला हप्ता 1 एप्रिलनंतरच सरकारकडून दिला जातो.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हप्ते आधीच पाठवण्यात आले आहेत.पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील लहान आणि अत्यल्प शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची
आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. देशातील मोठी संख्या असलेल्या शेतकऱ्यांना अर्थिक हातभार लागावा हे या योजनेचे उदिष्ट आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2022 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील 10 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर आता 11 वा हप्ता एप्रील 2022 मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याचे PM किसान e-KYC पूर्ण करावे लागेल. एका मोठ्या अपडेटनुसार सरकारने पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी रेशन कार्ड क्रमांक सादर करणे आवश्यक केले आहे.
त्यामुळे संबंधित माहिती शेतकऱ्यांनी सादर करणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केला जातो.
तर तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जारी करण्यात येतो. PM किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता एप्रिल 2022 मध्ये जारी केला जाईल अशी शक्यता आहे.सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला
भेट द्या.यानंतर ‘लाभार्थी स्थिती’ वर क्लिक करा.डेटाच्या उपलब्धतेनुसार आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबरचा पर्याय निवडा.यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.यानंतर लाभार्थी स्थिती तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.