माय महाराष्ट्र न्यूज:स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेत एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन ट्रान्झेक्शन करताना
ऑनलाइन फ्रॉड , सायबर क्राइम यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. यावर एसबीआयने योग्य उपाय शोधून काढला आहे. एबीआयने आपल्या ग्राहकांना एटीएमसंबंधी महत्त्वाची
सूचना दिली आहे. यापुढे एसबीआय ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर ओटीपी टाकणे गरजेचे आहे. ग्राहकांने असे केले नाही तर फ्रॉड होण्याचा धोका होऊ शकतो, असे एसबीआयने सांगितले आहे.
एसबीआयने 1 जानेवारी 2022 पासून एटीएम ट्रान्झेक्शन अधिक सुरक्षित करण्यासाठी ओटीपी बेस्ड ट्रान्झेक्शन सुरू केले आहे. एटीएम कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने
आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बेस्ड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहक
ज्यावेळी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातील. त्यावेळी एटीएमचा वापर करत असताना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी नंबरचा मॅसेज येईल. ओटीपीद्वारे ग्राहक दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त
पैसे काढू शकतात, असे एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे. ओटीपी बेस्ड एटीएममुळे ग्राहकांचे अनऑथराइज्ड एटीएम ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव होण्यास मदत होईल.एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यावर ग्राहक एटीएमचा वापर करत
असताना ओटीपी येईल.एसबीआय ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.ग्राहक या ओटीपीद्वारे एटीएममधून पैसे काढू शकतात.हा ओटीपी 4 अंकी असेल. याद्वारे तुम्हाला एकदा ट्रान्झेक्शन करता येईल.