Wednesday, May 25, 2022

फेसबुक वापरता? मग ही बातमी वाचाच नाही तर..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुमचं फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडियावर अकाऊंट असेल आणि तुम्हाला फेसबुकच्या नवीन फिचरबद्दलची कल्पना नसेल, तर लवकर हे फीचर ऑन करा आणि अकाऊंट लॉक होण्याचा त्रास टाळा.

फेसबुकने अनेक अकाऊंट लॉक केले असून, फेसबुक प्रोटेक्ट हे फीचर ऑन नसल्यामुळे हे करण्यात आलं आहे.या महिन्याच्या सुरूवातील फेसबुककडून या फीचरबद्दलची माहिती त्यांच्या यूजर्संना मेलद्वारे देण्यात

आलेली आहे. द व्हर्जच्या एका रिपोर्टनुसार फेसबुक प्रोटेक्ट ऑन करण्यासाठी कंपनीकडून मेल पाठवण्यात आला आहे.यामध्ये फेसबुक प्रोटेक्ट फीचर ऑन केलं नाही, तर अकाऊंट लॉक केलं जाईल, असं म्हटलेलं आहे.

रिपोर्टनुसार हा ईमेल [email protected] या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या स्पॅम फोल्डरमध्ये हा मेल गेला आहे.ज्या व्यक्तींना हा मेल मिळाला,

पण त्यांनी फेसबुक प्रोटेक्ट ऑन केलं नाही. त्यांचं अकाऊंट कंपनीकडून लॉक करण्यात आलं आहे. लॉगिन करताना अशा व्यक्तींना यासंदर्भातील मेसेज दिला आहे. त्याचबरोबर प्रक्रियेबद्दल सांगितलं जात आहे.

१७ मार्चपर्यंत फेसबुक प्रोटेक्ट ऑन करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, ज्यांनी ऑन केलं, तरीही काहीजणांचं अकाऊंट लॉक झाल्याचंही समोर आलं आहे.अनेक यूजर्संनी ट्विटरवरून स्क्रीनशॉट शेअर करत याबद्दल म्हणणं मांडलं आहे.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड फोनवर मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली जात आहे. हाय रिस्क असणाऱ्या यूजर्संनी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घेण्याची सूचना मेटाने गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये केली होती.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!