माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील दोन तरूणांनी राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून नेले. दि. 10 मार्च रोजी राहुरी
तालुक्यातील केंदळ येथून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले.राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. दि. 10 मार्च रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील केंदळ
येथून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणारे हे नेवासा तालुक्यातील आहेत. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला फोन केला, तेव्हा तो म्हणाला तुला काय करायचे
ते कर, मी घाबरत नाही. असे म्हणून त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. आरोपींनी अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीचे अपहरण केले. याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल भाऊसाहेब काकडे व रितेश भाऊसाहेब काकडे दोघे रा. सोनई, ता. नेवासा यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.