माय महाराष्ट्र न्यूज:सध्याची राजकीय धुळवड थांबून विकासावर चर्चा झाली पाहिजे,’ अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.मंत्री थोरात म्हणाले
महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करीत आहे.कोरोनापाठोपाठ आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळासह अनेक संकटांतून मार्ग काढत या सरकारने आर्थिक स्रोत कमी असतानाही सर्वसामान्य जनतेच्या
हितासाठी काम केले आहे. या कामाचा देशपातळीवर गौरव झाला आहे. मात्र, सध्या राज्यामध्ये सुरू असलेली राजकीय धुळवड ही दुर्दैवी आहे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत. विकासावर चर्चा झाली पाहिजे, अशी आपली भावना आहे.
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मागील वेळीही ‘पुन्हा येणार’ असे म्हणाले होते. ते ज्या वेळेस ‘आम्ही परत येऊ’ असे म्हणतील, त्या वेळेस ते येणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे 2024मध्येही महाविकास
आघाडीच सत्तेवर येईल. भाजपचे राजकारण हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. त्यांची कार्यपद्धती देशहिताची नाही, म्हणून भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष व जनतेने प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही मंत्री थोरात म्हणाले.