Wednesday, May 25, 2022

राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? कुटुंब नियोजन किटमध्ये देण्यात आले रबरी लिंग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या  सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो.

या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा  उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय. मात्र, राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर आलंय. त्यामुळे एकच

खळबळ उडाली आहे. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्या समोर अजब पेच निर्माण झाला आहे. तर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.आशा सेविका कुटुंब नियोजनासाठी गावागावात जाऊन महिलांचं समुपदेशन करत असतात.

मात्र, राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आलंय. मात्र यामुळे आशा सेविकांसमोर समोर मोठा पेच निर्माण झाला असून हे रबरी लिंग प्रात्यक्षिक

दाखवण्यासाठी त्या किटमध्ये देण्यात आलेय. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडलाय. त्यामुळे राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

तर प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण

भागातील महिलांसमोर जायचं कसं? या विवंचनेत आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळत आहे. आशा सेविकांशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला

नकार दिला. मात्र सरकारच्या या अजब कारभारावर महिलांमधून संताप व्यक्त होत आहे.हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे.

त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…

मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!