माय महाराष्ट्र न्यूज: रेशनचे धान्य घेण्यासाठी आपणाला आपले रेशन कार्ड त्या रेशन दुकानावरती घेऊन जावे लागते. त्याशिवाय आपणाला ते धान्य मिळत नाही. मात्र आता केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना एक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यामुळे आपणाला हे धान्य आणण्यासाठी रेशन कार्डची गरज पडणार नाही.केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्डधारकांना रेशनची सुविधा घेण्यासाठी रेशनकार्ड दाखवण्याची गरज नाही.
आतापर्यंत रेशन धान्य दुकानात धान्य घेताना रेशन कार्ड देणं गरजेच होते परंतु आता शिधापत्रिका धारक जिथे राहतात, तेथील रेशन दुकानात फक्त रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना रेशन मिळेल
अशी माहिती सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत दिली.तसंच रेशन कार्ड प्रक्रिया सोपी करण्यात आली असून देशात वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा लागू करण्यात आली आहे. सरकारच्या
आकडेवारीनुसार, देशात जवळपास 77 कोटी लोकांना वन नेशन वन रेशन कार्डद्वारे जोडण्यात आलं आहे. यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 96.8 % आहे.एखाद्या व्यक्तीचं रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरी
निमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळू शकतं. यासाठी मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही.