Wednesday, May 25, 2022

आता कोविशील्ड लसीच्या २ डोसमध्ये अंतर पुन्हा कमी ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोविशील्ड लसीच्या २ डोसमध्ये अंतर पुन्हा कमी करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने याबाबत केंद्र सरकारला शिफारस केली आहे.

NTAGI नं म्हटलं आहे की, कोविशील्ड लसीच्या २ डोसमधील अंतर कमी करून ८ ते १६ आठवडे केले जावे. यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे होते. मात्र आता आलेल्या

नव्या शिफारसीनंतर हे अंतर घटवण्यात येणार आहे. परंतु लसीकरण अभियानात याची अंमलबजावणी कधी होईल हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचसोबत कोव्हॅक्सिन लसीच्या २ डोसमधील अंतर कमी

करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. भारतात कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे.अधिकृत सूत्रांनुसार, NTAGI ने जागतिक स्तरावरील आकडेवारी पाहून यावर दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे.

कोविशील्डचा दुसरा डोस आठ आठवड्यानंतर दिला तर त्यापासून तयार होणारी एन्टीबॉडी १२ ते १६ आठवड्यानंतर मिळणाऱ्या डोस इतकीच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या शिफारसीला मंजुरी दिल्यानंतर देशात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

कारण पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या लोकसंख्येत बरेच अंतर आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत असल्याने दोन डोसमधील अंतर कमी करण्याचं कारण मानलं जात आहे.

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस अशावेळी आलीय जेव्हा भारतात कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत घट होत आहे. मागील २४ तासांत भारतात एकूण कोरोनाचे १ हजार ७१६ रुग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!