माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डी मतदार संघातील केलवड, खडडेवाके, पिपरी लोकाई नांदुर्खी, दहेगाव, वाळकी डोऱ्हाळे, कोऱ्हाळे आडगाव येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थीना विविध साहित्य वितरण कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे आज झाला.
या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उत्तर प्रदेश येथील डॉ.एन सिंग,
डॉ. आर के श्रीवास्तव, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गमे, पी. डी. गमे, काळू रजपूत, गणीभाई शेख, सचिन मुरादे, सतीश बावके, बाळसाहेब डांगे, उत्तमराव डांगे, संतोष ब्राम्हणे, सुनील गमे, नामदेव घोरपडे, नकुल वाघे, पुनम बर्डे, संगिता कांदळकर आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले शिर्डी मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम सुरु आहे. राज्यातील महाआघाडी सरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले. वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले
पण आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करून वीज तोडणी थांबविली आहे. कोविड काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले योगदान काय? दुधाचा प्रश्न आणि दूध दरवाढीचे आश्वासन दिले. पुर्तता मात्र अजूनही नाही. निवडकीपुरते जनतेसमोर येणारे
देखील जनतेत नाही. केंद्र सरकारवर टीका करतांना आपण काय केले हे जनतेला सांगा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हातील 41 हजार लोकांना यांचा लाभ दिला, मात्र येथील खासदार मात्र कुठे दिसत नाहीत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनाचा आढावा घेत असतांनाच सर्वांना बरोबर घेत समाजिक दायित्वाचा वारसा आपण जपत आहोतं. पण विखे पाटील यांचे नाव घेतल्या शिवाय काहीना चैन पडत नाही मात्र आपण
याकडे दुर्लक्ष करतो आपण सर्वांना पुरुन उरतो. त्यामुळे आपण आपली चिंता करा आमची चिंता करू नका असा सल्ला देत असतानाच या योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुकर केले आहे, असेही त्यांनी सांगितले.