माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या भावात घसरण झाली बघायला मिळाली आहे.कांद्याचे दर चांगलेच गडगडले आहे.दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 7578 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 1300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत काल 7 हजार 578 कांदा गोणी आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 1000 रुपये ते 1300 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 650 ते 950 रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळींबाच्या 486 के्रटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला प्रतिकिलोला 71 ते 110 रुपये
असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 46 ते 70 रुपये भाव मिळाला.डाळिंब नंबर 3 ला 26 ते 45 रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 25 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.