माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.
विधानसभेत विरोधी पक्षाने धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी धानाला बोनस द्यावा, अशी मागणी केली. कारण छोट्या
शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. सर्वच मागणी करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी धान उत्पादनकांना बोनस आम्ही देणार नाही. कारण ती मदत शेतकऱ्यांना पोहोचत नाही. दलाल त्यात पैसे घेतात. एकरमागे
काही मदत द्यायचा प्रयत्न आम्ही करु, असे सांगत 600 कोटी रूपये पॅकेज देवू पण बोनस नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राज्यात मोबाईलवरून ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना
दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे. आता 31 मार्चपर्यंत पीक पहाणी नोंदवता येणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण बहुतेक भागात पिकांची कापणी सुरु झाली. नोंदणीत
अडचण असल्यास तलाठ्याशी संपर्क साधण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल.
तथापि, ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
एकूण हप्ते सवलत 4 भागात विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले 3 हप्ते पुढच्या 9 महिन्यात भरावे लागणार आहेत. आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास त्या व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ देण्यात येईल.
सदर अभय योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून कोरोना संकटाने अडचणीत आलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यात, उभारी देण्यात
ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, तसेच योजनेला उद्योग व व्यापार क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.