Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना:अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी आळीपाळीने अत्याचार 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पिडीत १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी ही घटना घडली. पिडीता तिच्या आई-वडील आणि भावासह नगर शहरास वास्तव्यास आहे. पिडीतेच्या भावाचे आणि तिच्या घराशेजारी राहणारे सिल्वर चव्हाण याचा मुलगा अनिल या दोघांचे दारू

पिण्यावरून भांडणे झाली होती. त्यावरून आरोपी अनिल चव्हाण याने पिडीतेच्या आईला दगडाने मारहाण केली होती. पिडीतेची आई मारहाणीत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिडीता रविवारी शेळ्या चारून दुपारी घरी आली. त्यानंतर तिने जेवण तयार करून तिच्या आईला डब्बा रूग्णालयात पोहोच केला. त्यानंतर पिडीतेच्या वडिलांनी तिला दुचाकीवरून घरी सोडले. रात्रीच्यावेळी

पिडीता झोपलेली असताना आरोपी सिल्वर चव्हाण, वरगा चव्हाण, सुनील चव्हाण आणि अनिल चव्हाण हे चौघेही पिडीतेच्या घरी आले. त्यानंतर आरोपी सिल्वर चव्हाण आणि त्याची बायको वरगा चव्हाण यांनी पिडीतेचे हात धरले असता

आरोपी सुनील आणि अनिल चव्हाण यांनी पिडीतेवर आळीपाळीने अत्याचार केला. पिडीतेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आजी त्याठिकाणी आली असता आरोपी तेथून निघून गेले. पिडीतेवर

उपचार सुरू असून तिने दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!