Thursday, October 5, 2023

जनसामान्यांचे नेतृत्व-आ.शंकरराव गडाख

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/Newasa

सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून वयाच्या 20 तीच आ शंकररावजी गडाख साहेब यांनी नेवासा तालुक्यातील गावा ,गावात तरुण,शेतकरी,कष्टकरी ,माता भगिनी यांच्याशी थेट संपर्क करत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची सुरू केलेली रुजूवात अखंड सुरू आहे.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एखादा ऑफिसवर बसण्याऐवजी चहाच्या टपरीवर,रस्त्याच्या कडेला,गाडीत बसूनही ते सहजतेने सोडवतात.राजकारणात,समाजकरणात शब्दांचे खेळ करून दुसऱ्याला झुलवत ठेवणे यापेक्षा स्वतःला त्याचा राजकीय तोटा जरी झाला तरी खोटे आश्वासन देऊन
कुणाला फसवण्यापेक्षा तात्काळ निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो. साधी राहणी व उच्च विचार सरणी हे त्यांच्याकडून नेहमी शिकण्यास मिळते.
दिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहून काम कसे करावे याचा वस्तुपाठ
त्यांनी सर्वांना घालून दिलेला आहे.
वेळेला व वचनाला पाळणारे म्हणून त्यांच्याकडे सर्वत्र आदराने पाहिले जाते असे लहान ,थोरांचे आदर्श म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.
शेता बांधावरील काम करणारी माता भगिनी आर्थिकदृष्ट्या स्व:यपूर्ण व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा बँकेमार्फत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन
सर्वसामान्य जनतेला आधार दिला.
तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी कुटूंबातील मुले व्यापारी व्हावेत या हेतूने घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना व्यापारी केले यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळू लागले
तसेच कांदा मार्केट सुरू झाल्याने घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला गती मिळाली अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.
नेवासा ,कुकाना येथे बाजार समिती मार्फत पुण्या मुंबईच्या मॉललाही लाजवेल असे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करून ग्रामीण भागात व्यापारी पेठेला बळकटी दिली.
यामुळे नेवासा शहरासह,कुकाना परिसरात बाजार पेठ फुलण्यास मदत होणार आहे.
संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांचा वापर लोकाभिमुख कामांसाठी करण्यावर त्यांचा भर असतो.
शेती,पाटपाणी,आरोग्य,वीज,शिक्षण, रस्ते या मूलभूत प्रश्नांची सोडवून करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.
सत्ता पद असो वा नसो त्यांचे जनसेवेचे व्रत अव्याहतपणे सुरूच असते.
धर्मकारण,समाजकारण यांची सांगड घालून त्यांचे काम नेहमी सुरू असते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत
विरोधकांनी सर्व बाजूंनी घेरलेले असतांना देखील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात एकहाती विक्रमी मतांनी विजय संपादन करून
कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता तालुक्याचे हित डोळ्यासमोर ठेवून
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये
मा आ शंकररावजी गडाख साहेब यांना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली
मिळालेल्या संधीचे सोने करत आ शंकररावजी गडाख साहेब यांनी नेवासा तालुक्यातील गावागावातील रस्ते,पुल,सभामंडप,कालवा दुरुस्ती,लिफ्ट इरिगेशन,बंधारे खोलीकरण,शाळा,ग्रामीण रुग्णालये,पशुवैद्यकीय दवाखाने पाणी योजना,वीज सबस्टेशन ,प्रशासकीय इमारती आदींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला यामुळे तालुक्यातील गावा गावातील शेकडो सार्वजनिक प्रश्न मार्गी लागले.
मंत्रीपदाच्या माध्यमातून
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही राज्यस्तरीय योजना सुरू करून राज्यातील जलसाठा वाढवण्यास हातभार लावला.
तालुक्यातील घोगरगाव,धनगरवाडी या गावांमध्ये वीज सबस्टेशन च्या कामांना मंजुरी मिळवून विजेचा प्रश्न मार्गी लावला.शेकडो रुपयांचा निधी पाणी योजनांसाठी मंजूर करून आणला यामुळे
गावा ,गावातील वाड्या वस्त्यांवर शुद्ध पिण्याचे पाणी घरा ,घरात उपलब्ध होणार आहे यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे व सर्वांची तहान भागणार आहे.
राज्यातील झालेल्या सत्तांतराप्रसंगी पक्षाने अनेक वर्षे मनाचे पद दिलेले अनेक आमदार पक्ष सोडून गेले व मंत्री पदे मिळवले.पक्ष सोडणे सहज शक्य असतानाही ज्या पक्षाने आपल्याला पद दिले ते नेतृत्व अडचणीत असतांना त्यांना न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून निष्ठा काय असते हे देशाला आपल्या कृतीतून दाखवून दिले.

तालुक्यातील जनतेला आपले कुटूंब मानणारे साहेब जनतेच्या सुख दुःखात आपलेपणाने
सहभागी होतात.
तालुक्यातील क्षेत्र क्षेत्र देवगड,श्री शनैश्वर महाराज,ज्ञानेश्वर महाराज यांवर त्यांची अपार श्रद्धा आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भक्तिभावाने ते लिन होतात.
अनेक गरजू रुग्णांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात.
यांमुळे अनेक रुग्णांना मदत झाली असून त्यांना जीवदान मिळाले आहे.एखाद्याला केलेली
केलेली मदत कधीही दुसऱ्यांना सांगायची नाही हा त्यांचा स्थायीभाव आहे.
मा खा यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या समवयस्क कार्यकत्यांचे ते नेहमी मार्गदर्शन घेतात.
पहाटे 4 पासून त्यांचा दिनक्रम सुरू असतो सकाळी 8 पासून ते जनसेवेत सक्रिय असतात.
त्यांना भेटण्यासाठी आलेला माणूस समाधानाने घरी जावा यासाठी ते प्रयत्नशील असतात.
भेटण्यासाठी आलेला माणूस अल्पोहार व चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये असा त्यांचा दंडकच आहे.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाही
आजारी असलेल्या कार्यकत्यांच्या घरी भेट देऊन तसेच दुःखद घटना घडलेल्या कुटूंबियांना सांत्वन भेटी देऊन धीर व आधार देण्याचे काम त्यांनी आजही केले.
स्वतः चा वाढदिवस डामडौल न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो
नेवासा तालुक्याच्या सर्वागीण विकासाचे व्रत घेऊन काम करणारे जनसामान्यांचे नेते मा ना शंकररावजी गडाख साहेब यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा

वसा जनसेवेचा….
आशीर्वाद जनसामान्य जनतेचा…

शब्दांकन- राहुल राजळे
9527110809

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!