Saturday, September 23, 2023

बीआरएस पक्ष नगर जिल्ह्यात घराघरात पोहचवा: बी.जे.देशमुख बाभळेश्वर येथे पार पडली पक्षाची बैठक

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:बीआरएस पक्ष नगर जिल्ह्यात घराघरात पोहचवा व जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे आला पाहिजे त्यासाठी तालुका समन्वयक यांनी काम केले पाहिजे त्यासाठी प्रत्येक दिवस म्हत्वाचा आहे .एक महिना पक्ष सदस्य नोंदणी काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे असे मत पुणे विभागीय समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

भारत राष्ट्र समितीच्या उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे तालुका समन्वयक यांची बैठक राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथे भारत राष्ट्र समितीचे नाशिक विभागीय समन्वयक दशरथ काका सावंत ,नगर जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर उंडे, विष्णूपंत खंडागळे, संजय देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली.

बाळासाहेब देशमुख पुढे बोलताना म्हणाले की तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे शेतकऱ्यांसाठी प्रंचड काम केले आहे.आणी ते संपूर्ण देशभर शेतकऱ्यांविषयी कमी करणार आहे.तेलगंणामध्ये शेतकऱ्यांना वीज व पाणी मोफत तर बियाणे,खते तसेच औजारे कमी पैशात उपलब्ध करून दिले आहे.

समाजातील प्रत्येक घटकांसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काम केले आहे.पुढच्या काही महिन्यांत तेलंगणा मॉडेल आपल्या नगर जिल्ह्यात घराघरात पोहोचले पाहिजे. राज्यातील कांदा,दुध, उस व इतर प्रश्नासाठी आपल्याला काम करायचे आहे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल. दलित बंधू योजना,

जेष्ठ नागरिक योजना, आरोग्यासाठी सुविधा तेलंगणा मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.पक्षाचे धोरण जनतेबरोबर पोहचवा येणाऱ्या निवडणुकीत पक्ष मोठ्या ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुका समन्वयक यांनी जबाबदारीने काम करा असे बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.

नाशिक विभागीय समन्वयक दशरथ काका सावंत असा बीआर एस पक्ष एकमेव पक्ष आहे की तो पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात पोहचला आहे.नगर जिल्ह्यात आपल्याला पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे.समता, समृद्धी

समानता या तीन नितीवर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे काम चालू आहे. भारत राष्ट्र समिती या पक्षामुळे जनतेला नवा पर्याय मिळाला आहे. निष्ठेने काम करून पक्ष व संघटना आपल्याला सर्वांना मजबूत करायचे आहे.शेतकरी हे पाहिले प्राधान्य के चंद्रशेखर राव यांच्याकडे आहे.त्यामुळे सर्वांनी प्रामाणिक काम

करून भारत राष्ट्र समिती पक्ष प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा असे आवाहन दशरथ काका सावंत यांनी केले.या बैठकीला सचिन वाबळे, योगेश वाबळे ,केशव बेंद्रे , भानुदास देशमुख ,सूर्यंभान गाडे, अशोक गायकवाड ,ओंकार बडाख, इमाम पठाण, संजय देशमुख आदी उपस्थित होते.बैठकीचे आयोजन करण्यासाठी शुभम देशमुख, प्रमोद बेंद्रे, यांनी मेहनत घेतली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!