माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:अबकी बार किसान की सरकार’ हा अजेंडा घेऊन भारत राष्ट्र समिती (BRS) पार्टी देशपातळीवर संघटन विस्तार करण्यासाठी सर्वशक्तीनिशी सज्ज झाली आहे. पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्रातील २८८ मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान सुरू होत आहे.
मराठवाडा मध्येही भारत राष्ट्र समिती पक्षाची नोंदणी जोरात सुरू आहे याचाच आढावा.सिडको संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समिती पक्षाचे मराठवाडा विभाग प्रमुख सोमनाथ थोरात यांनी पक्षाची सभासद नोंदणी आणि पक्षाच्या प्रचार प्रसिद्धी कामाची आढावा बैठक घेतली. बैठकी साठी भारत राष्ट्र समीती पक्षाचे जिल्हा समन्वयक अण्णासाहेब माने, विधानसभा समन्वयक जयमलसिंग रंधवा, फिरोज पटेल, बाळासाहेब सानप, कैलास तवर, फिरोज पटेल, जेष्ठ नेते बापू भुसारे, युवा नेते श्री गुलाम अली,संतोष कोळगे पाटील जनार्दन साबळे आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ थोरात यांनी मार्गदर्शन करताना नोंदणी कशी करायची प्रचार प्रसिद्धी कोणत्या मुद्दा वर जोर द्यावा तेलंगाणा राज्यातील जन कलयाण योजना तसेच पक्षाचे धोरण यावर मार्गदर्शन केले कामकाज आढावा घेतला . तेलंगाणा मॉडेल, पक्षाचे ध्येय धोरण लोकांना सांगणे पोहोचवणे आणि सभासद नोंदणी चे माध्यमातून पक्षाबरोबर जोडून घेणे.
प्रचार गाड्या एक मनिनाभर गावागावात जातील, पत्रके वाटतील, जनतेशी संवाद साधतील, ’केसीआर’ सरकारनं तेलंगणामधे अंमलात आणलेल्या शेतकरी विषयक आणि इतरही कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देतील, सभासद नोंदणी करतील. सोबतच पक्ष समिती, शेतकरी समिती, महिला समिती, ओबीसी समिती, मागासवर्गीय समिती, आदिवासी समिती, अल्पसंख्यांक समिती, युवा समिती आदी समित्या स्थापन करतील यावर सविस्तर मार्गदर्शन थोरात यांनी केले.
तेलंगाणानंतर BRS चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी जर महाराष्ट्रात BRS सरकार आले, तर शेतीसाठी 24 तास मोफत वीज, मोफत पाणी’ देण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.