Saturday, September 23, 2023

नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील तर उपसभापतीपदी नानासाहेब नवथर 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील तर उपसभापती पदी नानासाहेब नवथर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नेवासा बाजार समिती निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख गटाने सर्वच्या सर्व १८ जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. सभापती-उपसभापती निवडीनंतर गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते नवीन पक्षाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मागील बाजार समितीच्या निवडणुकीपेक्षा आमदार गडाख यांचे मताधिक्य वाढल्याने सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा आमदार गडाख यांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली तर माजी आमदार मुरकुटे व लंघे यांना पालकमंत्री नामदार विखे यांनी ताकद दिली , मेळावा घेतला याउलट गडाख यांनी कुठलाही मेळावा घेतला नाही साधे प्रचाराचा नारळही फोडला नाही विरोधांकांनी आरोपच्या फैरी झाडल्या त्याची गडाख यांनी दखल सुद्धा घेतली नाही . मतदाराशी त्यानी थेट संपर्क चालू ठेवला त्यांच्याशी सावंद साधला.आमदार शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत खूप नवीन फंडा आणला कारण जिल्ह्यात व राज्यात मतदारांना सहली , जादूचे प्रयोग असे वेगवेगळे प्रकार झाले पण नेवासा बाजार समिती याला अपवाद ठरली . गडाख यांनी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली अगदी छोट्या गावातून उमेदवार पुढे केले , सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले , गावातील राजकीय वैर मिटवले ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी गावात ग्रामपंचायत , सोसायटी यात दुसऱ्यांना संधी देऊन गावात राजकीय हस्तक्षेप करू नये याचा शब्दच घेतला व निवडून आल्यावर संघटना बांधावी असेही सांगितले .
आमदार गडाख यांच्यावर खूप नाराजी असून त्यांना जनता धक्का देईल अशी चर्चा विरोधकानीं केली , गडाख यांचे प्रमुख कार्यकर्ते नाराज आहे असेही बोलले गेले पण मतदारांनी मोठा कौल गडाख यांच्या बाजूने दिला व मोठे मताधिक्य मिळवत सर्व जागेवर यश मिळविले . मुरकुटे यांनी प्रस्थापित लोकांना उमेदवारी दिली तर गडाख यांनी जनतेतील अगदी सामान्य लोकांना उमेदवारी देऊन यश संपादन केले हे विशेष मतदानाच्या आधी चार दिवस भाजपच्या पॅनल मधील उमेदवाराने आमदार शंकरराव यांच्या उपस्थितीत प्रवेश करून मुरकुटे यांना धक्का दिला याची मोठी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांत झाली
पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका असल्याने ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली भाजपच्या उमेदवारी वरून लंघे व मुरकुटे यांच्यात मोठी रस्सीखेच आहे तर गडाख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्तिच आहे . मुरकुटे याना उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे तर गडाख यांनी आतापासूनच तयारी चालू केली आहे . लग्न , दहावे , सार्वजनिक कार्यक्रम व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जागेवर सोडवणूक करत गावा गावात जनसंपर्क ठेवत गडाख तालुका पिंजून काढत आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!