नेवासा
नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय त्वरित बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नेवासा तालुका शिवसेनेने पोलीस निरीक्षकांना दिला आहे.
नेवासाचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापासून नेवासा तालुक्यात अचानक अवैध्य व्यवसाय सुरू झाले आहेत. या मध्ये विनापरवाना दारू विक्री, ऑनलाईन बिंगो, मटका , जुगाराचे क्लब यामुळे सामान्य लोकांचे प्रपच धुळीला तर मिळतातच परंतु ज्या ठिकाणी हे व्यवसाय चालू असतात त्या ठिकाणी टपोरी, दारू पिणारे , गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर जास्त असतो या मुळे त्यांच्या मधेच भांडणे होणे शिवीगाळ हे रस्त्यावर चालू असतात. यामुळे रस्त्यावर सामान्य नागरिक, महिला, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
या साठी नेवासा तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी काही दिवसा पूर्वी नेवासा पोलीस निरीक्षक यांची भेट घेवून त्यांना हे अवैध्य व्यवसाय बंद करण्यासाठी विनंती केली होती.
परंतु यावर नेवासा पोलिसांनी कुठली ही कार्यवाही न करता उलट बघ्याची भूमिका घेतली, यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुन्हा एकदा नेवासा पोलीस निरीक्षक यांची आज पुन्हा एकदा भेट घेवून आठ दिवसात हे अवैध्य व्यवसाय बंद करावे असे निवेदन दिले आहे.
अवैध्य व्यवसाय बंद न झाल्यास
दि. 5 जून 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजे पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख मीराताई गुंजाळ, तालुका प्रमुख संजय पवार, उपशहर प्रमुख बंडू शिंदे यांच्या सह कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.