भेंडा/नेवासा
शिक्षण संस्था आणि शिक्षक ही ज्ञान मिळविण्यासाठीची साधने आहेत.मात्र गुणात्मक स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःला स्वतःच सिद्ध करावे लागते.या पुढील काळात तुम्हीच तुमचे मार्गदर्शक असणार आहात.त्यामुळे जीवनाला आकार देण्याची संधी निर्माण झालेली आहे,प्रयत्नामध्ये सातत्यता ठेवा,यश तुमचेच आहे असे प्रतिपादन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयाच्या
इयत्ता बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गौरी खरड, साक्षी वाबळे,ओम फुलारी(विज्ञान शाखा),चैताली वांढेकर,अनुजा टाक, आकांक्षा आढागळे(कला शाखा), शुभांगी जामकर, ओम वाघ, प्राची इंगळे(वाणिज्य शाखा)
तर शिष्यवृत्ति परीक्षेत प्रावीण्य मिळविलेले सोहम पोतदार व रितेश घुले या विद्यार्थ्यांचा माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी आ.श्री.अभंग म्हणाले, ग्रामीण साठी शेतकऱ्यांची स्पर्धा परीक्षेत चमकावित यासाठी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण विदयार्थांनी कष्ट व मेहनत या बळावर आपले कर्तृत्व सिध्द करून जीवनात यशस्वी व्हावे.ज्ञानदानाच्या कार्यात शिक्षकांचे योगदान आहेच मात्र ते
ज्ञानदानाचे कर्तव्य अधिक जबादारीने पार पडावे.
यावेळी प्राचार्य रामकिसन सासवडे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख, शिक्षण संस्थेचे लेखपाल अर्जुन गायकवाड, संतोष फुलारी,
कामगार संघटनेचे खजिनदार आप्पासाहेब शिंदे, सदस्य सुरेश आरगडे, अविनाश टाक,सुधाकर नवथर, सुयोग घोरपडे ,गोरक्षनाथ म्हस्के, बाळकृष्ण मिसाळ, महेश डुकरे ,श्री.मांडे सर आदी यावेळी उपस्थित होते.
शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे यांनी प्रस्ते केले.प्रा. राजेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले.