माय महाराष्ट्र न्यूज: भारत राष्ट्रीय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या सोशल मीडिया कोअर कमिटीची बैठक हैदराबाद येथे नुकतीच पार पडली.
या बैठकीत तेलंगणा राज्याचे मॉडेल, भारतातील राजकीय सद्यस्थिती, राजकारणात येणाऱ्या तरुण तरुणींचा राजकारणातील सहभाग यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत भरत देशमुख यांनी सांगितले.
भारताच्या विकासचक्राला गती देण्यासाठी तेलंगणात राबविण्यात येत असलेल्या योजना आणि धोरणे देशभरात राबविल्या पाहिजेत. तेलंगणाने जे केले ते राष्ट्रीय स्तरावरही केले जाऊ शकते. तेलंगणाच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण भारतात लागू केले जाऊ शकते.
स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊनही भारत का विकसित होऊ शकला नाही, भविष्यातील भारत कसा असेल आणि यामध्ये तरुणांची भूमिका काय असेल याबाबत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मार्गदर्शन केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
देशात सध्या सर्वाधिक वाईट स्थिती शेतकरी वर्गाची असून तेलंगणा मॉडेल शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करू शकतो’ असंही मुख्यमंत्री केसीआर यांनी यावेळी सांगितले आहे.
बैठकीला बीआरएसच्या सोशल मीडिया कोअर कमिटीचे सदस्य उदयराव घाटगे, सदस्य चिन्मय जोशी व शशिकांत ससाणे उपस्थित होते.