Monday, May 23, 2022

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना: शिक्षकांने स्वयंपाक घरात घुसून महिलेला मारली मिठी अन्

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात एका शिक्षकाने महिलेशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

महिला ही स्वयंपाक करीत असताना हे मास्तर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी महिलेला मिठी मारली, जेव्हा, त्याचा गलिच्छ हेतू समोर आला तेव्हा महिलेने एकच कज्जा केला. ही आरडा ओरड

झाल्यानंतर मास्तरने घरातून धुम ठोकली, मी तुला मिठी मारली हे जर कोणाला सांगितले तर तुला मी ठार करेल अशी या बहादराने धमकी दिली आणि तो पसार झाला. मात्र, घाबरलेल्या या महिलेने मोठ्या धाडसाने घडला प्रकार आपल्या

पतीस सांगितला आणि दोघांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादिनुसार बाबाजी बहिरुनाथ गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर

माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एक ४० वर्षीय महिला शेती करुन आपली गुजरान करते. ती शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. तर, त्याच वेळी पीडितेचे पती आणि सासू

दैनंदिन बाहेर काम करत होते. तेव्हा, आरोपी मास्तर बाबाजी गुंजाळ हा गुपचूप घरात घुसला. पीडित महिला कामात व्यस्त असताना त्याने तिच्याशी काही लगट करण्याचा प्रयत्न केला आणि इकडचे-तिकडचे

बोलणे झाल्यानंतर बाबाजी गुंजाळ याने अचानक पिडित महिलेला मागून मिठी मारली. अचानक झालेल्या प्रकारामुळे पीडित महिला घाबरुन गेली. त्यामुळे, तिने आरडाओरड सुरु केली. मात्र, यात मास्तरला घाम फुटला आणि त्याने तिला ओरडू नको अशी विनंती केली.

मात्र, चुकीच्या उद्देशाने झालेला हमला तिच्या लक्षात आला आणि तिने त्याला विरोध केला. मास्तरचे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य संबंधित महिलेला अनपेक्षित होते. त्यामुळे, तिने मास्तरला धडा शिकविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मास्तरने तेथून काढता पाय घेतला. जाताना त्याने पीडित महिलेस धमकी दिली की; मी तुला मिठी मारली, हे जर तू कोणाला सांगशील तर मी तुला जीवे मारुन टाकेल. असे म्हणत तो तेथून पळून गेला.

दरम्यान पीडित महिला घाबरुन गेली होती. मात्र, तरी देखील संबंधित व्यक्तीच्या कृत्यास अभय न देता तिने घडलेला प्रकार आपल्या पतीस आणि सासुला सांगितला. त्यानंतर, रागाच्या भरात यांनी मास्तरला धडा शिकवायचा

निर्णय घेतला. मात्र, तोवर मास्तर पसार झालेला होता. त्याचा शोध घेऊनही मिळून आला नाही. त्यानंतर, पीडित महिलेच्या पतीने कायदेशीर आधार घेत थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस अधिकारी साहेबांसमोर महिलेने घडला प्रकार कथन केला.

त्यानंतर, पोलिसांनी फिर्यादिनुसार शिक्षक बाबाजी बहिरुनाथ गुंजाळ याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पुढील तपास अमित महाजन करीत आहे..

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!