Wednesday, May 25, 2022

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय:उन्हाळी सुट्ट्या रद्द

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं.

हे नुकसान भरुन काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय.एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय

घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षाच्या काळात अवघे काही दिवस

शाळा सुरु राहिल्या. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, त्यालाही अनेक मर्यादा असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. तसंच विद्यार्थ्यांचंही मोठं

शैक्षणिक नुकसान झालं आहे. अशावेळी शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचा

कस लागत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरु ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील उन्हाळी

सुट्टी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अभ्यास करावा लागणार आहे.मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पालकांना फिरण्याचे वेध लागतात. मागील दोन वर्षात

कोरोना प्रादुर्भावामुळेही अनेक कुटुंब घरातच अडकून पडली होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. तसंच सरकारकडून अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. अशावेळी यंदा पालकांनी मुलांच्या शाळांना उन्हाळी

सुट्ट्या लागल्या की फिरण्याचे बेत आखले होते. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्याचा निर्णय शाळेल शिक्षण विभागानं घेतला आहे.

त्यामुळे पालकांना आता आपला उन्हाळी सुट्टीचा बेत बदलावा किंवा रद्द करावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!