Wednesday, May 25, 2022

सुजय विखेंवर टीका करताना जयंत पाटलांची जीभ घसरली म्हणाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप खासदार सुजय विखेंनी महाविकास आघाडीवर टीका करताना पातळी सोडली होती. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नवरा-बायकोची

उपमा देत त्यांनी टिका केली होती. त्यावरून जयंत पाटलांनी आज आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.यावेळी जयंत पाटील म्हणाले, नवरा, बायको,पाहुणे अशा

बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना देणाऱ्या षंढांबाबत काहीही बोलण्याची गरज नाही. कारण,षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, अशा जळजळीत शब्दात जयंत पाटील यांनी टीका केला. पुढे ते म्हणाले, महाविकास

आघाडीचे आमदार फुटत नाहीत अस भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते प्रचंड चिडून टोकाला गेले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांवर आणि मविआच्या काही मंत्र्यांवर राग काढला जात आहे. महाराष्ट्रातील

सरकार पाडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड, भेद या सगळ्याचा वापर केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.दरम्यान काल विखे बोलताना म्हणाले होते की महाविकास आघाडीचा संसार

असा आहे की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यांनी काही मनमानी करावी त्यांना कुणी काही बोलत नाही. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे. ती बिचारी

खूप दु:खी आहे पण तिला बोलता येत नाही. तर काँग्रेस हे वराती आहे. त्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिन बुलाये लग्नाला गेलेत. त्यांना लाज नाही. त्यांना जेवायला कुणी बोलावलं नाही पण ते जेवणाचं

ताट सोडेनात. त्यांना हाणलं, कुणी काही बोललं तर ते खाली बसून जेवायला तयार आहेत. पण जेवणाचं ताट काही सुटेना’, अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!