Wednesday, May 25, 2022

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!1 एप्रिलपासून ‘या’ गोष्टी महागणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यात सतत पेट्रोल डिझेल , गॅस सिलेंडर आणि तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झाले आहे.

चलनवाढ आणि सध्या सुरु असलेल्या पुरवठा साखळीच्या समस्येमुळे ग्राहक उपयोगी वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. त्यातच आता 1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किमती वाढणार आहे.

त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. महागाई आणखी वाढणार असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर होण्याची शक्यता आहे. त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट

कोलमडण्याची शक्यता आहे. येत्या 1 एप्रिलपासून काय काय महाग होणार आहे ते आपण पाहणार आहोत 1 एप्रिलपासून खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. अंडी, मांस आणि दूध यासारखे पदार्थ महागणार

आहेत. पण पुरवठा-साखळी आणि कामगार समस्यांमुळे कोकाकोला आणि पेप्सिकोलाने देखील किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या देखील किमती वाढवणार आहेत. त्याचसोबत ओरियो कुकीज, रिट्स

क्रॅकर्स आणि सॉर पॅच किड्स 2022 हे देखील महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून कपडे खरेदी करणे देखील महाग होणार आहे. सध्या अनेक दुकानदार हे कोरोना काळातील वॉर्डरोब्स खाली करत आहेत. मात्र पुरवठा

साखळीच्या दबावामुळे किरकोळ किमती सरासरी 3.2 टक्क्यांनी वाढतील, असे मॅकिन्से बिझनेस ऑफ फॅशनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर 15 टक्के फॅशन एक्झिक्युटिव्ह 2022 मध्ये 10 टक्के किंवा त्यापेक्षा

जास्त किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.1 एप्रिलपासून हॉटेलवर जेवण करणे महाग होणार आहे. कोरोनाच्या काळापासून रेस्टॉरंट्सवर दबाव आहे. सध्या सुरु असलेली कर्मचारी आव्हाने

लवकरच दूर होणार नाहीत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना अन्नासाठी अधिक पैसे देऊन कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवावे लागले आहे. त्याचाच परिणाम मेनूच्या किमती सुद्धा वाढल्या आहे.

1 एप्रिलपासून घर खरेदी करणे देखील महागरणार आहे. 1 एप्रिलपासून केंद्र सरकार प्रथम घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी

1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष 2022-23 पासून ही सुविधा वाढवण्यात येणार नसल्याचे सांगितले.1 एप्रिलपासून वाहन खरेदी करणे देखील

महागणार आहे. नवीन कारच्या किमती उच्चांकावर आहेत. त्यातच वापरलेल्या कार आणि ट्रकच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरातल्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!