Monday, May 23, 2022

सावधान! तुम्ही हे’ ऍप डाउनलोड केल्यास तुमचा बॅंक बॅलन्स होईल झीरो

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गूगल व फोन पेवरील पेमेंट अडकले, ऑनलाइन पार्सल मिळाले नाही, अशावेळी संबंधित व्यक्‍ती गूगलवरून कस्टमर केअर शोधतो. तो क्रमांक लागतो आणि काही क्षणातच कट होतो.

त्यानंतर लगेचच समोरून दुसऱ्या क्रमांकावरून कॉल येतो आणि त्यांना एक ऑनलाइन फॉर्म भरून द्यायला सांगितले जाते. काहीवेळाने त्या व्यक्‍तीच्या मोबाईलवर सहाअंकी क्रमांक येतो आणि तो

विचारून घेतला जातो. एक ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते. त्यानंतर त्या व्यक्‍तीच्या बॅंक खात्यातून सगळे पैसे काढून घेतले जातात.सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून सायबर गुन्हेगारांनी

वेगवेगळे फंडे शोधले आहेत. सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये जानेवारी ते 28 मार्च 2022 या काळात जवळपास 27 जणांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्यात ग्रामीणमधील 12 जणांचा

समावेश आहे. ‘गूगल पे’वरून ट्रान्झक्‍शन झाले नाही किंवा फ्लिपकार्ड, ऍमेझॉन, झोमॅटोवरून पार्सल आले नसल्याने त्यांनी गूगलवरून कस्टमर केअर शोधला. त्या नंबरवर संबंधित व्यक्‍तींनी कॉल केला आणि त्यांना

दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आले. त्यांची अडचण ओळखून त्यांनी त्यांची समस्या दूर होण्यासाठी एक फॉर्म भरून घेतला. फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी समोरील व्यक्‍तीला बॅंक डिटेल्स दिले. त्यानंतर समोरील व्यक्‍तीने

संबंधित तक्रारदाराला एक लिंक पाठवून ऍप डाउनलोड करायला भाग पाडले. शेवटच्या टप्प्यात ती समोरील व्यक्‍ती तक्रारदाराचा मोबाइल स्वत: ऑपरेट करतो. त्यानंतर समोरील अनोळखी व्यक्‍ती

तक्रारदाराच्या मोबाईलवर आलेला ओटीपी वापरून त्याच्या बॅंक खात्यातून सगळी रक्‍कम परस्पर लंपास करतो, असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून

सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!