Tuesday, May 24, 2022

दोघांना नोकरीच्या बहाण्यानं पुण्यात आणलं अन्; सेक्स रॅकेटमध्ये अडकले

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील आंबेगाव परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तर वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीडित तरुणी ह्या मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांना नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आणण्यात आलं होतं.विपुल बाबासाहेब बेलदरे (36, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार (24, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) असं

अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर पोलिसांनी संजय प्रसाद महतो, केदार मंडल आणि त्याच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून

पुणे-मुंबई महामार्गावरील ब्रम्हा लॉजवर सेक्स रॅकेट चालवत होते. परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.याबाबत अधिक माहिती देताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं की, पुण्याच्या

आंबेगाव परिसरातील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटबाबत

पाठपुरावा केला. खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाकडून ब्रम्हा पॅलेस लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून दोन तरुणींची सुटका केली आहे.

आरोपी विपुल बेलदरे आणि विक्रम शोनार दोघं उत्तर प्रदेशातील 20 आणि 21 वर्षीय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!