Thursday, October 5, 2023

खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करा नेवासा बीआरएसची मागणी 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण जोपर्यंत सिंह यांना सर्व पदावरुन हटवून तुरुंगात टाकत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका भारतीय कुस्तीपटूंनी घेतली आहे.सरकारने अत्यंत असंवेदनशील प्रतिसाद दिला. याबाबत भारत राष्ट्र समिती नेवासा समन्वयक ओंकार बडाख यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार यांना निवेदन दिले त्यांतभारत राष्ट्र समिती पक्ष नेवासा वतीने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्वरीत अटक करा आणि त्यांचे संसदेतून निलंबन करा.त्याच्याविरुद्धच्या तक्रारींची न्यायालयीन चौकशी करा आणि कालबद्ध, सुयोग्य, निष्पक्ष तपास करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवा.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ विरोधी (POSH )आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) या दोन्ही कायद्यांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवश्यक ती सर्व पावले उचला आणि सक्षम व प्रभावी यंत्रणा तयार करा.अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!