माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांना नेहमीच रडविणारा आणि कधी-कधी हसविणारा जर कोणी असेल तर तो कांदा आहे. कांद्याची शेती कितींना फायदेशीर आहे, असे विचारल्यास परवडत नाही.
किंबहुना कांद्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळही येते. कांद्याचे उत्पादन म्हणजे खाया ना पिया गिलास तोडा बाराना अशीच आहे. तरीही खानदेशी शेतकरी कांद्याचे उत्पादन घेण्याचा नाद सोडत नाहीत.
दोन-तीन वर्षांतून एकदा जरी भाव मिळाला तरी दोन वर्षांची कमाई निघते. आता तर येथील युवा शेतकरी कांद्याच्या बीजोत्पादनाकडे वळले आहेत. येथील राजा पाटील या युवा शेतकऱ्याला चार एकरांमधून
पंधरा ते वीस लाखांचे बीजोत्पादन अपेक्षित आहे. सध्या प्रतिक्विंटले तीन हजारांचा भाव आहे अन् तोही वाढताच आहे.खानदेशात कांदा उत्पादनासाठी कापडणे परिसर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ‘कापडणेचा
कांदा’ म्हटल्यानंतर इंदूर व नागपूरच्या बाजारपेठेत विशेष भाव मिळतो. कापडणेसह नंदाणे, बुरझड, लामकानी, बोरीस, नेर, कुसुंबा पट्ट्यात कांदा उत्पादन घेण्यात शेतकरी माहिर आहेत.
येथील युवा शेतकरी पाटील यांना कांदा उत्पादनाचा छंद आहे. स्पिंकलर अथवा ठिबकने विक्रमी उत्पादन काढतात. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय भरदार बीजोत्पादनाकडे वळले आहेत. या वर्षी
चार एकरांमधून पंधरा ते वीस क्विंटल अपेक्षित आहे. प्रतिक्विंटल तीन हजारांचा भाव मिळाल्यास पाटील यांची आखाजीलाच दिवाळी साजरी होणार आहे.