Tuesday, May 17, 2022

बाळूमामांचे भाकीत :देश, महाराष्ट्र, युद्ध, आजार,पीक तसेच विविध विषयांवर मोठं विधान वाचा सर्व काही ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे महाभयंकर परिणाम जगाला भोगावे लागतील. कोरिया, चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील. जगातील अनेक राष्ट्र एकमेकांशी लढतील.

एकमेकांचे भाग काबीज करतील. कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगात तिसरे महायुद्ध होईल. भारतावर तीन राष्ट्रे आक्रमण करतील. भारत -पाकिस्तान युद्ध सुरूच राहील. भारतीय सैनिक भारत

मातेचे रक्षण करतील. परकीयांचे हल्ले परतवून लावतील. अशी बाळूमामा भाकणूक कृष्णा बाबुराव ढोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली.श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा भंडारा यात्रा प्रसंगी

भाकणूक कार्यक्रमात भविष्यवाणी केली. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यामुळे आगामी वर्षात काय होणार याचा सूचक इशारा या ठिकाणी मिळत असल्याने साऱ्याचे लक्ष या भाकणुकीकडे लागून राहते.

बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो भाविकांच्या समोर ही भाकणूक मंगळवार (दि. २९) मार्च रोजी पहाटे चार वाजता संपन्न झाली. या सोहळ्यास सुमारे १ लाखांहून

अधिक भाविक आल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.अठरा तर्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजारांची संकट येतच राहतील. आजारावर औषध मिळणार नाहीत. डाॅक्टर

लोक हात टेकतील. जगावर आलेलं कोरोनाचं संकट कमी जास्त होईल. कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभले. हा सगळा मायेचा बाजार हाय. निती धर्माला अनुसरुन वागा. सुखात ठेवीन.

राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल.साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं

राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील.

दीड महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पिक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकलं. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल.वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा.

ताज्या बातम्या

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...
error: Content is protected !!