Friday, May 20, 2022

नगर जिल्ह्यातील घटना:पतीवर हल्ला पत्नीने जिवावर उदार होत त्याला अक्षरशः 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बिबट्याने जबड्यात घट्ट पकडलेले आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी पत्नीने जिवावर उदार होत त्याला अक्षरशः बुकलून काढले. त्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा केला.

नंतर अक्षरशः बिबट्याच्या शेपटीला धरून मागे खेचले. आपलीच शिकार होते की काय, अशी अवस्था निर्माण झाल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही आधुनिक सावित्री परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

डोंगराच्या कुशीत असणा-या दरोडी चापळदरा भागात गोरख पावडे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख पाहण्यासाठी गेले.

त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. तो आवाज ऐकून त्यांच्या पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत वडील दशरथ व पाळीव कुत्रेदेखील तिकडे धावले.

बिबट्याने गोरख यांचे डोके जबड्यात पकडले होते. अक्षरशः काळ समोर असतानाही संजना यांनी, कशाचाही विचार न करता बिबट्याचे पाय व शेपटी जोरात ओढली. वडील दशरथ यांनी मोठा दगड बिबट्याला मारला.

पाळीव कुत्र्याने आपल्या मालकासाठी थेट बिबट्याचे नरडेच धरले. संजना यांनी पुन्हा बिबट्याच्या पोटात बुक्क्या मारायला सुरवात केली. चोहोबाजूंनी झालेल्या हल्ल्यामुळे बिबट्याला तेथून धूम ठोकावी लागली.

रविवारी दिवसभर या थरारक घटनेची दरोडीच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पुढील उपचारासाठी गोरख पावडे यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.बिबट्याने पती गोरख

यांचे डोके पकडलेले पाहिले. मी कशाचाही विचार न करता त्याचे दोन्ही पाय व शेपटी जोरात ओढली, तरीही तो त्यांना सोडत नव्हता. सासरे दशरथ यांनी त्याच्या पोटात दगड घातला. आमच्या कुत्र्याने

त्याच्या गळ्याला चावा घेतला. त्यानंतर तो भांबावून गेला व तेथून पळ काढला.- संजना पावडे, बिबट्याशी लढणारी महिला.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!