माय महाराष्ट्र न्यूज: पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि आता भाजपाचे असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना भान राखावं. त्यांचे पूर्ण कुटुंबच एकेकाळी काँग्रेसमध्ये होते.
आता काँग्रेसवर बोलताना इतिहास लक्षात ठेवावा, राजकारणाचा वापर सकारात्मक कामासाठी करावा, अशी कानउघडणी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. तुळजापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पती, शिवसेना मूक पत्नी कर काँग्रसे बिन बुलाए महमान आहे, असं वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतच अहमदनगर येथे केलं होतं.
त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही त्यांची चांगलीच कानउघडणी केली. यासोबतच केंद्र सरकार ज्या पद्धतीने राजकारण
करतंय, ते लोकशाहीसाठी मारक आहे, अशी खंतही अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली.काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण उस्मानाबादेत म्हणाले, सुजय विखे अजूनही नवखे आहेत. राजकारणात नवे आहेत. ज्या काँग्रेसवर ते टीका करत आहेत
त्या काँग्रेसमध्ये एकेकाळी त्यांचे सर्व कुटुंबच होते. त्यामुळे त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.तसेच मुंबईत 300 आमदारांना घरे देण्याच्या महाविकास
आघाडी सरकारच्या निर्णयावरून आरोपांचे रान पेटले असताना याबाबतही मोठं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. ते म्हणाले, आमदारांना घरे देण्याचा निर्णयच झालेला नाही. मुळात काँग्रेसच्या कोणत्याही
आमदारांनी अशी मागणी केलेली नाही. असा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.