Wednesday, May 25, 2022

विखेंचा सहा एकर ऊस जळाला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता बघायला मिळत आहे.यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी उस पेटण्याच्या घटना समोर येत आहे.

अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात समोर आली आहे.राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुप्रिया यांचा सहा एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला.

ऊस पिकासह ठिबक व पाईप लाईनचे लाखो रुपयांचे नुकसान आगीत झाले.सोमवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास उसाला आग लागल्याचे लक्षात आले.दुपारची वेळ आणि उन्हाचा कडाका यामुळे आग

वेगाने पसरली. पुढच्या आठ-दहा दिवसांत हा ऊस तुटून कारखान्याकडे गाळपासाठी जाणार होता.उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन केलेले असल्याने पीक उत्तम स्थितीत होते. विखे,तनपुरे आणि गणेश साखर

कारखान्याच्या अग्निशामक गाड्या घतनास्थळी बोलावण्यात आल्या. अनेक तास आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले.मात्र सहा एकर ऊस,ठिबक संच आणि पाईप लाईन आगीत जळून गेले.

लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले.सुदैवाने या उसाच्या आजूबाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान मात्र झाले नाही.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!