भेंडा/नेवासा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “इंडिक टेल्स” या वेबसाइटवर त्वरित बंदी घालून संबधितांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केली आहे.
नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार दि.३१ मे रोजी सकाळी ९ वाजता भेंडा बुद्रुक येथे बस स्थानक चौकात निषेध सभा घेण्यात आली.त्यावेळी श्री.अभंग बोलत होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, महिला तालुकाध्यक्षा सौ.संगीता गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, डॉ.अशोकराव ढगे,दत्तात्रय काळे, डॉ.शिवाजी शिंदे,शिवाजी कोलते,सोपानराव महापूर,नामदेव निकम, सरपंच उषा मिसाळ,देवेंद्र काळे, संदीप फुलारी,शंकर भारस्कर, शरद निकम, ज्ञानेश्वर आरगडे, दिलीप गोर्डे,भाऊसाहेब काळे, रामभाऊ देशमुख, दशरथ मापारी,उपसरपंच सागर महापुर, संभाजीराव माळवदे, युवक उपाध्यक्ष सचिन तागड,केतन काळे, वैभव नवले,सुभाष चौधरी,
कुमार नवले,हरिभाऊ नवले,
रामकृष्ण नवले,अजित रसाळ आदि यावेळी उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले की,
एक खेदजनक आणि निंदाजनक अशी ही गोष्टी आहे, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी व त्यांच्यावर कार्यवाही करावी म्हणून सरकारला विनंती करणेकरिता लोकशाहीच्या मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वजण इथं या ठिकाणी जमलेलो आहोत.संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे संबंध देशांमध्ये हे निषेधाच्या सभा प्रत्येक ठिकाणी चालू झालेल्या आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी संबंध या देशामध्ये काम केलं. पूर्वी बारा-बारा वर्ष दुष्काळ पडत होते. पाणी पिण्याची मोठी टंचाई असायची,त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अहिल्याबाईनी बारव निर्माण करून केवळ महाराष्ट्रामध्येच नाही सबंध देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. समाजाचे एकत्रिकरण टिकण्यासाठी प्रयत्न केले.अशा थोर समाज सुधारकांची बदनामी होत असताना आपण गप्प बसलो तर आपण दुर्दैवी माणस ठरणार आहोत.म्हणून हा निषेध करून ती जी वेबसाईट आहे, ज्यांनी ते लिखाण केलं त्यांच्यावर सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी व त्यांना अटक केली पाहिजे, त्यांचं लिखाण्याचा परवाना रद्द केला पाहिजे अशी मागणी आपली मागणी आहे. जर काही कार्यवाही झाली नाही तर मोठा आंदोलन छेडण्याचं सुद्धा काम आपल्याला निश्चित प्रमाणामध्ये करावे लागणार ते आणि आपण ते नक्की करू असे श्री.अभंग म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले,डॉ.अशोकराव ढगे, सोपान महापुर,सौ.संगीता गव्हाणे, सरपंच प्रा.उषा मिसाळ,वैभव नवले,केतन काळे यांनी ही भाषणातुन निषेध व्यक्त केले.
बाळासाहेब आरगडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.