Tuesday, May 24, 2022

नगर ब्रेकिंग:ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगर शहरातील पत्रकार चौकात एका ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार झाले. त्यातील उद्धव सुभाष तलोरे (वय १९) हा  एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

तर त्याच्यासोबत प्रवास करणारा बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय २२) हाही ठार झाला आहे. त्याच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालयात शिकत होते.आज दुपारी हा अपघात झाला. हे दोघे युवक दुचाकीहून

नगर-मनमाड रोडने सावेडीकडून पाथर्डी रोडकडे निघाले होते. पत्रकार चौकातून जात असताना अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. नगर शहरातून दिवसा अवजड वाहतुकीला बंदी असते. तरीही हे वाहन भरधाव वेगाने

जात होते. शहीद भगतसिंग उद्यानाजवळून जात असताना तेलोरे यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. त्यांची दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडली गेली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या चौकातच

वाहतूक पोलिसांचे मुख्य कार्यालय आहे. दुपारची वेळ असल्याने चौकात पोलिस नव्हते. शिवाय या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे आढळून आले.अपघातातील मृत युवकांबद्दल

माहिती मिळाल्यावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलूबाईचे गावचे आहेत. यातील उद्धव याचे वडील सुभाष शिवलिंग तेलोरे एसटी महामंडळाच चालक होते. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी संगमनेर

बसस्थानकात एसटी बसमध्येच गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. एसटीचा तुटपुंजा पगार, करोनानंतर ढासळलेली आर्थिक स्थिती याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याची

ती पहिली आत्महत्या ठरली होती. त्यानंतर राज्यात आणखी काही ठिकाणी आत्महत्या झाल्या. पुढे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि अद्याप तो सुरू आहे. याच तेलोरे यांचा मुलगा

आज अपघातात ठार झाल्याने तलोरे कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!