Monday, May 23, 2022

नगर जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना होणार चांगला फायदा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीक कर्जाची मर्यादा एकरी 20 हजार ऐवजी 30 हजार करण्यात आली आहे. मंगळवारी अहमदनगर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीला संचालक मंडळाने एकमुखी पाठिंबा दिला. बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन

माधवराव कानवडे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.करोना काळात अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत व्हावी तसेच त्यांची सावकारी जाचातून मुक्तता व्हावी, यासाठी माजी मंत्री कर्डिले यांनी पीक कर्जाची

मर्यादा एकरी 20 हजार ऐवजी 30 हजार करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पीक कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता मार्चअखेर ज्या सभासदांनी आपले पीककर्ज पूर्ण भरले, असेल अशा

सभासदांना 15 एप्रिलपर्यंत ही कर्जसुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच करोनाकाळात संजीवनी ठरलेल्या खेळते भांडवल योजनेचे कर्जही नियमित भरणार्‍यांना परत मिळणार आहे.

ही दोन्ही कर्जे अल्पव्याजदराने मिळणार असल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मार्च अखेर

नियमीत कर्जफेड करून एप्रिलमध्ये वाढीव कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजीमंत्री कर्डिले यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!