माय महाराष्ट्र:शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य आगी लावण्यातच गेले आहे. त्यामुळे त्यांनी आपले आडनाव बदलून आगलावे करावे, अशी जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे
अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केली आहे.सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा संबंधी बोलताना सदाभाऊ खोत
यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काहीच केलेले नाही.जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे. यांचे संपूर्ण
आयुष्य हे आग लावण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून आगलावे करावे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. हे राज्य होरपळून निघाले असून आता थांबले पाहिजे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली. आता जर तुम्ही वीज तोडायला आलात तर शेतकऱ्याच्या हातात दांडके असतील आणि तुम्हाला सोलून काढलं जाईल
असा गर्भित इशारा सदाभाऊ खोत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. हे सरकार लुटारू असून यांना वसुली शिवाय दुसरं काहीच येत नसल्याचीही टीका खोत यांनी केली.