पुणे
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड़ हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे कडे साखर आयुक्तालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
श्री शेखर गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या साखर आयुक्तपदाची नवे साखर आयुक्त कोण? याविषयी राज्याच्या साखर उद्योगात कमालीची उत्सुकता होती.
मात्र, या रिक्त पदावर पूर्णवेळ सनदी अधिकारी नियुक्त न करता राज्य सरकारने तात्पुरती सूत्रे श्री. कवडे यांच्याकडे सोपविली गेली आहेत. श्री.कवडे यांनी नगर जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी म्हणून ही काम केलेले आहे.
ग्रामीण, कृषी, सहकार व महसूल क्षेत्राची उत्तम जाण असलेला सनदी अधिकारी म्हणून ते परिचित आहेत.