Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल; संत बाळूमामाच्या भाकणुकीने खळबळ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आदमापूर येथील संत बाळूमामा भाकणुकीचा सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मराठी वर्षाचा शेवटची भाकणूक

असल्यानं अनेकांचे लक्ष आगामी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतील याकडे लक्ष लागलं होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार असल्याने या तिन्ही पक्षात

किती काळ समन्वय राहील हे सांगणे कठीण आहे.त्यातच विरोधी पक्ष भाजपा सातत्याने सरकार पडणार असल्याची तारीख देत असतो परंतु अडीच वर्ष सरकारला काहीही झाले नाही. मात्र या काळात

सरकारचे २ मंत्री कोठडीत गेले आहेत. त्यामुळे सरकारवरील टांगती तलवार कायम आहे. त्यात बाळूमामाच्या भाकणुकीत देशाच्या राजकारणाच्या संदर्भात भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्याच्या

राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर करतील अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.इतकेच नाही तर राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस

पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळाचा झेंडा मिरवेल आणि काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरेल. देवा धर्माला विसरून लोकं राजकारणात जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल.

नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.तसेच सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील. दीड महिन्यात धान्य उदंड पिकेल.

खरीप पिक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकलं. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा.

बैलाची किंमत बकऱ्याला येईल वैरण – धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!