Tuesday, May 17, 2022

रोहित पवार त्या भाजप नेत्यांचा घेतला समाचार म्हणाले ज्यांच्या दुधातच आहे पाणी, त्यांची कशी असेल शुद्ध वाणी….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे.

खोत यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही खोत यांच्यावर टीका केली आहे. आंदोलन करताना दुधात पाणी घातलं जातं, अशी कबुली खोत व्हिडिओत देत आहेत.

त्यावरून ‘ज्यांच्या दुधातच आहे पाणी, त्यांची कशी असेल शुद्ध वाणी?’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.पवार यांच्यावर टीका करताना खोत यांनी म्हटलं होतं, ‘शरद पवारांनी या राज्यात

काड्या करण्यापलीकडं काहीही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि पुन्हा दुसऱ्या घरात आग लावण्यासाठी निघून जायचं. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे

त्यांनी स्वत:चं पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. या सगळ्यामध्ये हे राज्य होरपळून निघालं आहे, हे आता थांबलं पाहिजे,’ असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.यावरून राष्ट्रवादीनं त्यांना घेरलं आहे.

आता आमदार रोहित पवार यांनी खोत यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खोत एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत आहेत. तेव्हा सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधीची

ही मुलाखत आहे. सध्या रस्त्यावर दूध ओतून आक्रमक आंदोलनं सुरू आहेत, आपण याकडं कसं पहाता, असा प्रश्न पत्रकार खोत यांना विचारत आहे.याला उत्तर देताना खोत म्हणत आहेत, ‘ज्या पद्धतीने

मी गेली तीस वर्षे आंदोलनंच करीत आलोय. मला माहिती आहे दूध कसं ओतलं जातं. दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं. ते कसं ओतलं जातं. याच्यातूनच मी पुढं आलेलो आहे.

या व्हिडिओवर रोहित पवार यांनी खोत यांच्यावर ही टीका केली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!