नेवासा
राज्य शासनाच्या संकल्पन, प्रशिक्षण,जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी-मेटा) महासंचालक डॉ. संजय बेलसरे यांच्याकडे जलसंपदा विभागाचे सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार
सोपविण्यात आला आहे.
याबाबद जलसंपदा विभागाने
दि.३१ मे रोजी शासन आदेश काढला असुन त्यात म्हंटले आहे की,जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेकि) श्री. राजनकुमार र. शहा, हे नियत वयोमानानुसार शासन सेवेतून दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
श्री.शहा यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जलसंपदा विभाग सचिव(लाक्षेवि) या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कारणास्तव संकल्पन, प्रशिक्षण,जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक
डॉ. संजय मधुकर बेलसरे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.