माय महाराष्ट्र न्यूज:पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहे त्यातच आता नगर जिल्ह्यातील नागरिकांना
अजून एक धक्का बसला आहे.इंधन पुरवठा होत नसल्याने शहरासह जिल्ह्यातील २२ खासगी पेट्रोलपंप बंद असल्याची माहिती समजली. एकीकडे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता इंधन टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे.
क्रुड ऑईलच्या दरातील चढउतार व रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या दरावर परिणाम होत आहे. नगरमध्ये पेट्रोलच्या दरात ८४ पैशांची वाढ होऊन ११४ रुपये ९७ पैसे प्रतिलिटर झाले आहेत.
मागील दहा दिवसांत पेट्रोलचे दर १०९ वरून ११४ रुपयांवर येऊन पोहोचले आहे. डिझेलचे दरही मागील चार दिवसांत दररोज सत्तर ते ऐंशी पैशांनी वाढत आहेत. डिझेलचा दर ९७ रूपये ८४ पैशांवर पोहोचला आहे.
नगर शहरात मायराचे तीन पंप आहेत. हे पंप इंधन टंचाईसह इतर कारणांमुळे तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याची माहिती समजली. जिल्ह्यात रिलायन्सचे सुमारे १८ पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी नगर शहरातील एकमेव पंप सुरू आहे. आता औरंगाबाद
रोडवरील पंपही बुधवारपासून (३० मार्च) बंद होण्याची शक्यता आहे. पेट्रोलपंप चालकांकडून मागणी होत असली तरी गरजेनुसार इंधनपुरवठा होत नसल्याने, पेट्रोलपंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.रिलायन्सचे नगर शहरासह जिल्ह्यात १८ पंप आहेत, मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होत नाही. आमचा औरंगाबाद
रोडवरील पंप सुरू आहे. पण दोन दिवसांत शहरातील तीनही रिलायन्सचे पंप बंद होतील. त्यामुळे इंधन टंचाईवर तोडगा शासनस्तरावर काढावा.” सागर बक्शी, संचालक, रिलायन्स पेट्रोलपंप