Wednesday, May 25, 2022

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर निशाणा

साधत आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे.विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली

असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या

मुंबई कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्ष एकत्र आले. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद अजून कायम आहेत.

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत 100 जागा निवडून येतील

असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात जाहीर झालेला अर्थसंकल्प केवळ कमिशन लाटण्याच्या हेतूने बनविण्यात आला असून, त्याचा सामान्यांना जराही फायदा नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खूष ठेवल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!