माय महाराष्ट्र न्यूज:दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा कायदा लागू झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील
नामफलक आवश्यक असेल. यापूर्वीच्या तरतुदीत दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती.
याबाबत सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनातदोन्ही सभागृहात मान्य झाले असून या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे. त्यामुळे हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.
दुकाने व आस्थापनांमधून मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते. अशादुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाही, अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.
मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाचलिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असणार नाही.